Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 14:1
30 Iomraidhean Croise  

“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”


परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”


याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?” तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.”


मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्‍या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता,


मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले.


मी पाहिले, करुबांच्या बाजूला चार चाके, प्रत्येक करुबाच्या बाजूला एक चाक; आणि ती चाके पुष्कराजसारखी चकाकत होती.


तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती,


नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो.


मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.


आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”


तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.


आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल; कारण याहवेहने म्हटले आहे सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये व जे उरलेले असतील ते वाचतील आणि ज्यांना याहवेहने बोलाविले ते सुद्धा तारण पावतील.


“आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”


मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून सदासर्वदा राज्य करतील.


त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.


“मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करेन.


असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”


मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता.


लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.


मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले.


ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल.


जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन.


यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन”


मग मी एक फिकट रंगाचा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराचे नाव मृत्यू होते आणि अधोलोक त्याच्यामागून आला. पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोकांना युद्ध, दुष्काळ, पीडा आणि हिंस्र पशूद्वारे ठार मारण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan