Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 अजगराने त्याला परमेश्वराच्या पवित्र लोकांविरुद्ध लढून त्यांच्यावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य दिले. आणि प्रत्येक वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यावर सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 पवित्र लोकांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. सर्व वंश, लोक, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:7
20 Iomraidhean Croise  

परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.


जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!


“हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास.


मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,


“त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल.


मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले,


तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.


आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो.


तेव्हा येशू उत्तरले, “जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे.”


तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.”


राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल.


तेव्हा संतापलेला अजगर त्या स्त्रीच्या इतर मुलांना, म्हणजे जी सर्व मुले परमेश्वराच्या आज्ञा पाळीत आणि आपण येशूंचे आहोत अशी साक्ष देत असत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सिद्ध झाला.


तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.


ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan