1 तो अजगर वाट पाहत समुद्रकिनार्यावर उभा राहिला. मग मी माझ्या दृष्टान्तात एक विचित्र पशू समुद्रातून वर चढून येताना पाहिला. त्याला सात डोकी व दहा शिंगे होती. या शिंगावर दहा मुकुट होते. त्या पशूच्या प्रत्येक डोक्यावर परमेश्वर निंदक नावे लिहिलेली होती.
1 नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.
1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.
“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.
जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले.
कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.
या पहिल्या पशूच्या मूर्तीमध्ये प्राण घालून तिला बोलण्याची शक्ती देण्याचीही दुसर्या पशूला परवानगी देण्यात आली होती. मग खुद्द त्या मूर्तीनेच हुकूम सोडला: “जो कोणी त्या पशूच्या मूर्तीला नमन करण्याचे नाकारील, त्याला ठार मारले जाईल.”
मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या.
नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.
तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले.