Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्‍यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्‍या स्त्रीपुढे उभा राहिला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:4
22 Iomraidhean Croise  

“इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.”


त्या दिवशी, याहवेह त्यांच्या तलवारीने शिक्षा करतील— त्यांची हिंसक, मोठी आणि शक्तिशाली तलवार— लिव्याथान सरपटणारा सर्प, गुंडाळून घेणारा सर्प लिव्हियाथान; ते समुद्रातील या राक्षसाचा वध करतील.


तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे.


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.


मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराविरूद्ध लढले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याच्या दूतांनी युद्ध केले.


तो प्रचंड अजगर, म्हणजे दियाबल किंवा सैतान म्हटलेला, सर्व जगाला फसविणारा प्राचीन सर्प, याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर लोटून देण्यात आले.


हा पशू दिसावयास चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलासारखे व तोंड सिंहासारखे होते. अजगराने त्याला स्वतःचे सामर्थ्य, आसन व मोठा अधिकार दिला.


त्या अजगराने दुष्ट पशूला अधिकार दिले म्हणून लोक अजगराची आणि त्या दुष्ट पशूचीही उपासना करू लागले. त्यांनी उद्गार काढले, “याच्यासारखा महान कोणी आहे काय? याच्याशी युद्ध करण्यास कोणी समर्थ आहे काय?”


नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.


तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्‍या महानगरीचे दर्शक आहे.”


त्याने त्या अजगराला, त्या पुरातन सापाला, जो पिशाच्च किंवा सैतान आहे त्याला धरले आणि एक हजार वर्षांसाठी साखळदंडाने जखडून टाकले,


मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.


त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.


चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.


पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.


नंतर दुसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.


त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्‍या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती.


त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते जखमा करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan