Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:2
12 Iomraidhean Croise  

जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते, याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.


वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.


“हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात.


शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, मंदिरातून येणारा गलबला ऐका! आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या याहवेहचा हा ध्वनी आहे.


तू आता मोठ्याने का रडत आहेस— तुला राजा नाही काय? तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय?


म्हणून प्रसूती वेदनेत असलेली एका मुलाला जन्म देईपर्यंत आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत इस्राएलचा त्याग केला जाईल.


या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.


जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.


माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.


जसे यशायाहने लिहिले आहे: “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”


त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan