Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्‍याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 नंतर मी स्वर्गात उच्च वाणी ऐकली, तिने जाहीर केले, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार प्रगट झाली आहेत! कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली फेकण्यात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:10
24 Iomraidhean Croise  

याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.


परंतु आता आपला हात पुढे करून जे सर्वकाही त्याचे आहे ते हिरावून घ्या आणि मग पाहा, आपल्या तोंडावर तो आपल्याला खचितच शाप देईल.”


सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय?


परंतु आता, आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसाला लावून तर पाहा, म्हणजे तो खचितच तुमच्या तोंडावर तुम्हाला शाप देईल.”


कारण याहवेहचेच राज्य आहे आणि सर्व राष्ट्रांवर तेच अधिपती आहेत.


हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.


“त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.


येशूंनी उत्तर दिले, “असे तुम्ही म्हणता, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”


मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे.


तुमचे राज्य येवो, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही, तुमची इच्छा पूर्ण होवो.


येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो.


“शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.


आपल्या प्रभू येशूंच्या शक्तीने युक्त असा माझा आत्मा व तुम्ही एकत्र मिळून


त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.


त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्‍या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्‍या असाव्या;


सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.


कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”


जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.


ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्‍यापासून तारणप्राप्ती होत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan