Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:1
35 Iomraidhean Croise  

परंतु त्या देशात घडलेल्या चमत्कारिक चिन्हाबद्दल त्याला विचारण्यासाठी बाबेलच्या राज्यकर्त्यांनी जेव्हा दूत पाठवले, तेव्हा परमेश्वराने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याच्या अंतःकरणातील सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्याला सोडून दिले.


तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,


कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.


जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्‍यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे?


मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.


तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील.


त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो, त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील. मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे ते त्यांच्या देशात चमकतील.


परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.


मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.”


“मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील.


आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’


निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.


“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्‍या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील.


वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे.


वर आकाशात व खाली पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.


यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.


परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,


तुम्हासाठी माझी जी आस्था आहे ती दैवी आस्था आहे. मी तुम्हाला एक पती, ख्रिस्त त्यांचे वचन दिले होते, म्हणजे मी तुम्हाला एक शुद्ध कुमारी म्हणून त्यांना सादर करावे.


ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे.


परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय इतर कशाचीही प्रौढी मिरवावी असे माझ्याकडून न होवो त्याद्वारे मी जगाला व जग मला क्रूसावर खिळलेले आहे.


हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे.


तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”


तेव्हा स्वर्गात परमेश्वराचे मंदिर उघडण्यात आले आणि मंदिरात असलेला परमेश्वराच्या करारांचा कोश दिसू लागला. विजा चमकू लागल्या, मेघगर्जना आणि गडगडाट होऊ लागला. भूमिकंप झाला आणि गारांचे मोठे वादळ झाले.


तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.


आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.


नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.


नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan