Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन ऑलिव्ह वृक्ष व दोन समया हे ते साक्षीदार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 11:4
14 Iomraidhean Croise  

गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”


परंतु मी तर परमेश्वराच्या आश्रयाखालील जैतून वृक्षाप्रमाणे सुरक्षित आहे; परमेश्वराच्या अक्षय प्रीतिवर मी सदासर्वकाळ विसंबून आहे.


“पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे.


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.


याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, आणि त्याच्या फांद्या मोडून जातील.


“अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; कारण मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर देईन, आणि तू अनेक राष्ट्रांचे तुकडे करशील.” त्यांची लूट तू याहवेहला, त्यांची संपत्ती सर्व पृथ्वीच्या प्रभूला अर्पण करशील.


“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्‍यांनाही प्रकाश मिळावा.


पुढे घडणार्‍या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”


जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात.


याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.


तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan