Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17-18 त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत तो मी आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मृतप्राय अवस्थेत पडलो. त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस! जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत आहे तो मी आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:17
30 Iomraidhean Croise  

या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला: “अब्रामा, भिऊ नको; मीच तुझी ढाल, तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”


तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.


मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत.


मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”


मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला.


भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.


पुरातन काळापासून पिढ्यांना कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? मी, याहवेह—मी आदि आहे, मी अंत आहे—तो मीच आहे.”


“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.


“याकोबा, मी ज्यांना बोलाविले, त्या इस्राएला, माझे ऐक, मीच परमेश्वर आहे; मीच आदि आणि मीच अंत आहे.


मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”


पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्‍या मेघधनुष्यासारखे त्याच्या सभोवती तेज होते. याहवेहच्या वैभवासारखे त्याचे रूप होते. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मी उपडा पडलो आणि बोलणार्‍याची वाणी मी ऐकली.


तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे.


तो माझ्यासोबत हे बोलत असता, मी माझे तोंड जमिनीकडे केले आणि मी काही बोलू शकलो नाही.


मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन.


पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”


पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले.


देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे.


त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता.


मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता.


तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”


योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो


प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”


“स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पहिले व शेवटचे, जे मरण पावले होते व जिवंत झाले, ते असे म्हणतात.


मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan