Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्‍या धबधब्यासारखी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:15
11 Iomraidhean Croise  

सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.


जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्‍याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.


ते प्राणी पुढे चालत, तेव्हा मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तो जोरात वाहणार्‍या जलाशयासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा, लष्करी सेनेच्या घोषणेसारखा होता. जेव्हा ते स्थिर उभे राहत, तेव्हा ते त्यांची पंखे खाली करीत असत.


त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते.


याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.


आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.


त्याची त्वचा तेजस्वी होती, त्याचा चेहरा विजा चमकाव्यात तसा लखलखत होता. त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे होते. त्यांचे बाहू आणि पाय उज्ज्वल कास्यासारखे चमकत होते आणि त्याची वाणी फार मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखी प्रचंड होती.


मग मी आणखी एक पराक्रमी देवदूत, स्वर्गातून उतरतांना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते.


मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.


नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात!


“थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कास्यासारखा आहेत, ते परमेश्वराचे पुत्र असे म्हणतात:


Lean sinn:

Sanasan


Sanasan