Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 127:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 127:3
22 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्‍या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.”


एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”


एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?” याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.”


मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.”


आणि मला म्हणाले, ‘मी तुला फलद्रूप करेन आणि तुझी संख्या वाढवेन. मी तुला लोकांचा समुदाय करेन आणि तुझ्यानंतर हा देश तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन.’


आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाह हिच्यापासून झाला. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र हे होते.


याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली.


ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते.


त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या,


त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील; ते तान्ह्या बालकांवर दया करणार नाहीत, किंवा ते लहान मुलांकडे दयेने पाहणार नाहीत.


मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.


याहवेह तुम्हाला अत्यंत संपन्न करतील—तुमची संतती, तुमच्या गुरांची पिल्ले आणि तुमच्या भूमीतील उपज—जसे त्यांनी तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते.


तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.


त्याला तीस पुत्र आणि तीस कन्या होत्या. त्याने आपल्या कन्यांचा विवाह परकीय कुळात केला आणि आपल्या पुत्रांसाठी त्याने तीस तरुण स्त्रियांना परकीय कुळांतून आणल्या. इब्झानने इस्राएलचे नेतृत्व सात वर्षे केले.


या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan