Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 127:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 127:1
35 Iomraidhean Croise  

अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला.


म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.”


दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत.


माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”


संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.


मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल?


मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”


मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो, तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.


सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,


ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.


जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.


हे परमेश्वरा, राजाला न्यायदातृत्व आणि राजपुत्रास नीतिमत्व प्रदान करा.


त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले.


मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.


मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: शर्यत वेगवानांसाठी नाही, किंवा युद्ध बलवानाचे नाही, सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो.


जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?”


पहारेकरी नगरात गस्त घालत असता त्यांना मी सापडले. त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; तटावरील पहारेकर्‍यांनी तर माझी ओढणी काढून घेतली!


मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो; मी त्याला सतत पाणी देतो. मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.


इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत, ते सर्व ज्ञानशून्य आहेत; ते सर्व मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते पडून राहतात व स्वप्ने पाहतत, त्यांना झोपायला फार आवडते.


अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,


बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.


बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत निरोपे एका पाठोपाठ येत आहेत,


आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.


पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.


तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते.


परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात.


तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan