Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 102:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 102:2
21 Iomraidhean Croise  

परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,


माझ्या अपराधांची क्षमा करून माझ्या पापांची गय का करीत नाही? कारण लवकरच मी धुळीत पडणार आहे, तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी अस्तित्वात नसेन.”


परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता, तेव्हा ते व्याकूळ होतात; जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता, तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात.


याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?


हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.


याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.


परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका; हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.


तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, तुमच्या दासाला रागाने दूर लोटू नका; तुम्हीच माझे सहायक राहिले आहात; हे माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, मला नाकारू नका वा माझा त्याग करू नका.


तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा; त्वरेने येऊन मला सोडवा; माझ्या आश्रयाचे खडक व्हा, मला वाचवण्यासाठी बळकट दुर्ग व्हा.


याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा; त्वरेने या, याहवेह मला साहाय्य करा.


तुम्ही आपल्या सेवकापासून आपले मुख लपवू नका; त्वरेने मला उत्तर द्या, कारण मी संकटात सापडलो आहे.


हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.


तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा; तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा.


बराच काळ लोटल्यानंतर इजिप्तचा राजा मरण पावला. इस्राएली लोक क्लेशाने विव्हळत होते व आपल्या गुलामगिरीत रडून परमेश्वराचा धावा करीत होते; आणि त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतील त्यांचा धावा परमेश्वराकडे पोहोचला.


परमेश्वराने त्यांचे रडणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी त्यांनी केलेल्या कराराचे त्यांना स्मरण झाले.


जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.


मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.


मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.


मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan