Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 2:2
28 Iomraidhean Croise  

जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो.”


वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे.


हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत.


जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.


दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते,


प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत,


एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.


माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे.


शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.


मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल.


त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला.


आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो


तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल.


तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही.


मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभूमध्ये एकमनाचे व्हा.


कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो.


परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


त्यावेळचे तुझे अश्रू मला आठवतात. तुला पुन्हा भेटण्यास मी किती उत्कंठित झालो आहे, जेणे करून माझा आनंद पूर्ण होईल.


बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर.


पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला.


माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्‍या कशानेही होत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan