Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 9:5
18 Iomraidhean Croise  

परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.


याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले.


तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.


याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.


याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.


याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.


याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.


मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले.


तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात.


“अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले.


चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.


पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे.


जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले.


जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”


यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan