गणना 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “इस्राएल लोकांना सांग की, तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजांतला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा. Faic an caibideil |
एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.