Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:13
23 Iomraidhean Croise  

दहा तिवड्या व त्यांची दहा गंगाळे;


भांडी, फावडे आणि शिंपडण्याच्या वाट्या. शलोमोन राजासाठी हीरामाने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.


राजा, त्याचे कारभारी मंडळ, पुढारी आणि इस्राएली लोक यांनी परमेश्वराच्या मंदिरासाठी अर्पण केलेले सोने, चांदी, सोन्याची पात्रे व इतर वस्तू मोजून दिले व ते यरुशलेमला नेण्याची जबाबदारी मी त्या बारा पुढार्‍यांवर टाकली.


आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे.


प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.


आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.


रक्षक दलाच्या अधिकार्‍याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते.


बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.


“ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.


तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा.


वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल असावे,


त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील.


अर्पण आणणार्‍याने याहवेहसमोर एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळलेल्या बारीक सपिठाचा एका एफाचा दहावा भाग सादर करावा.


त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे.


मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.


प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.


पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.


दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.


त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले.


तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan