Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 6:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 6:23
27 Iomraidhean Croise  

एकमेकांपासून दूर होण्यापूर्वी त्यांनी रिबेकाहला आशीर्वाद दिला: “आमच्या भगिनी, तू लक्षावधींची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या शहरांचा ताबा घेवोत.”


नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.


मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला.


त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत: ‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ” अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.


त्याने उभे राहून सर्व इस्राएली मंडळीला उंच आवाजात असे म्हणत आशीर्वाद दिला:


अम्रामचे पुत्र: अहरोन व मोशे. अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे.


याजक आणि लेवीय हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले आणि परमेश्वराने त्यांचे ऐकले, कारण त्यांची प्रार्थना स्वर्गात, परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानापर्यंत पोहोचली.


मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.


याहवेह मोशेला म्हणाले,


रोम मधील सर्वजण, ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतात आणि ज्यांना त्यांचे पवित्र लोक होण्यासाठी पाचारण केले आहे: परमेश्वर जे आपले पिता व येशू ख्रिस्त आपले प्रभू यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.


परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.


याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.


यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.


परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.


हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.


हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो.


सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.


जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो.


परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan