Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 5:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 (याजकाने शापजनक शपथ घ्यायला लावावी आणि म्हणावे) ‘परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगवील तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 5:21
9 Iomraidhean Croise  

तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”


त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.


आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात, परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.


माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव शापवचन असे होईल; सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील, परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील.


ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’


जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.


हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.


तेव्हा यहोशुआने गंभीरपणाने शपथ घेतली: “जो कोणी यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल, तो याहवेहसमोर शापित ठरेल: “जो कोणी या शहराचा पाया घालेल; त्याचा प्रथमपुत्र मरण पावेल, आणि जो कोणी या शहराच्या वेशी उभारेल, त्याचा धाकटा पुत्र मरण पावेल.”


त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan