Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत. दर्शनमंडपामधील जी ओझी कहाथवंशजांनी वाहावयाची ती हीच.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:15
26 Iomraidhean Croise  

सादोक सुद्धा तिथे होता आणि सर्व लेवी लोक जे त्याच्याबरोबर होते ते परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेत होते. त्यांनी परमेश्वराचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोकांनी शहर सोडण्याचे पूर्ण होईपर्यंत अबीयाथारने यज्ञार्पणे केली.


याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला.


जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,


याहवेह परमेश्वराने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्याबरहुकूम लेव्यांनी कोशाचे खांब खांद्यांवर घेऊन तो वाहिला.


नंतर दावीदाने म्हटले, “लेव्यांशिवाय इतर कोणीही परमेश्वराचे कोश वाहू नये, कारण याहवेहने त्यांना त्यांचे कोश वाहण्यासाठी निवडले आहे, त्यांची सेवा निरंतर करण्यासाठी निवडले आहे.”


म्हणून लेव्यांना निवासमंडप व इतर सर्व सेवा साधने एका जागेवरून दुसर्‍या जागी नेण्याची गरज राहणार नाही.”


लोकांसाठी पर्वताच्या सभोवती सीमारेषा आख आणि त्यांना सांग, ‘कोणीही पर्वताकडे जाऊ नये किंवा त्याच्या पायथ्यालाही कोणी स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कोणी पर्वताला हात लावतील त्यांना मारून टाकावे.’


आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये.


दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील.


तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.


परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.


ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.


मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.


ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.


मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.


मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.


आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.


परंतु कोहाथी लोकांनी पवित्र वस्तू पाहण्यासाठी एक क्षणभरही आत जाऊ नये. नाहीतर ते मरण पावतील.”


कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.


नंतर मोशेने हे संपूर्ण नियमशास्त्र लिहिले आणि याहवेहच्या कराराचे कोश वाहणाऱ्या लेवीय याजकांना आणि इस्राएली लोकांच्या वडीलजनांना दिले.


मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली.


परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan