गणना 32:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरूद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास शासन होईल याची खात्री बाळगा. Faic an caibideil |
त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.