Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 30:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा एखादा पुरुष याहवेहला नवस करतो किंवा शपथ घेऊन स्वतःला बांधील करण्याचे वचन देतो, तेव्हा त्याने त्याचा शब्द मोडू नये व बोलल्याप्रमाणे त्याने ते करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाहिली तर त्याने आपली शपथ मोडू नये; जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 30:2
36 Iomraidhean Croise  

तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.


मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.


मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.


मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन.


जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;


महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे; तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन.


“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,


माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे.


माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन.


तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.


याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.


विचार न करता घाईघाईने समर्पण करणे आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे.


किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल.


पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत, ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत, जे शांतीची घोषणा करतात! हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर, आणि तुझे नवस फेड. कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत; त्यांचा कायमचा उच्छेद होईल.


तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.”


“आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते


तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.”


“आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल, पण मंदिरातील सोन्याच्या शपथेने मात्र तो बांधील आहे.’


तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे.


मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.


नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे.


परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”


परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही.


तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले.


दोन महिन्यानंतर ती आपल्या पित्याकडे परत आली आणि त्याने नवस केल्याप्रमाणे तिच्यासोबत केले आणि ती कुमारिका होती. त्यानंतर इस्राएली लोकांमध्ये प्रथा पडली,


Lean sinn:

Sanasan


Sanasan