Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 “लेवी वंशातील जितके पुरुष एक महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून त्यांची गणती कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:15
17 Iomraidhean Croise  

आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या.


जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते, आणि जे माझा शोध घेतात त्यांना मी सापडते.


“जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.


कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.


तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.


परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.


ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ.


एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.


याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.


एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती.


एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.


एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.


एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.


जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan