गणना 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दर शब्बाथ दिवशी एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी. Faic an caibideil |
आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.
“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,