Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहने मोशेला म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 28:1
17 Iomraidhean Croise  

शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.


आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.


नंतर दावीदाने ज्यांची मंदिरात होमार्पणे करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या याजकीय लेव्यांच्या हाती यहोयादाने याहवेहच्या मंदिराची देखरेख सोपविली. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, दावीदाने सांगितल्याप्रमाणे ते आनंद करीत होते आणि गाणी गात होते.


राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले.


शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण.


स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.


समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.


अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.


“ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.


हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.


मेजवान्या आणि नेमलेल्या सणांच्या वेळी, एका गोर्‍ह्यामागे एक एफाह, एका एडक्यामागे एक एफाह आणि कोकर्‍यांबरोबर त्याला आवडेल त्याप्रमाणे धान्य आणावे आणि एका एफाहमागे एक हीन तेल आणावे.


मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.


आणि याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे मोशेने आपले हात यहोशुआवर ठेवून त्याची नेमणूक केली.


“इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’


होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;


तुम्ही विशेष दिवस, महिने, ॠतू आणि वर्ष हे पाळता!


तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan