11 जर त्याच्या पित्याला भाऊ नसले, तर त्याचे वतन त्याच्या कुळातील जवळच्या नातेवाईकाला द्यावे, म्हणजे ते त्याचे वतन होईल. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांस हा न्यायाचा नियम असावा.”
11 त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वांत जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे, म्हणजे तो ते भोगील.”’ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा.
11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्यास ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
“याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;
त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल.