Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 26:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तरीपण कोरहाचे मुलगे मेले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 26:11
19 Iomraidhean Croise  

मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,


शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.


हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.


हे परमेश्वरा, प्राचीन काळी तुम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे.


माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे.


परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.


अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा; उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.


याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.


अहो सर्व राष्ट्रांतील लोकहो, माझे शब्द ऐका; अहो सर्व जगातील,


सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.


कोरहाच्या पुत्रांची नावे: अस्सीर, एलकानाह व अबीयासाफ. ही कोरही कुळे होती.


मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.


आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.


ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले.


मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.


शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;


रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.


आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan