Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:7
31 Iomraidhean Croise  

शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.


तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर.


आणि याकोब आपल्या पित्याची व आईची आज्ञा पाळून पद्दन-अराम येथे गेला.


जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले.


त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते,


इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:


इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:


संकटकाळी मला भिण्याचे कारण काय, जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात—


मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन;


जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.


“हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग.


मग मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, माझ्याविषयी हे लोक म्हणतात, ‘हा केवळ दाखलेच सांगत नाही ना?’ ”


त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”


“ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’


‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”


कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.”


नंतर त्याने हा संदेश सांगितला: “बालाका, ऊठ आणि ऐक; सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.


म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले.


मग त्याने हा संदेश दिला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,


यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला: “तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे, तुझे घरटे खडकात स्थिर आहे;


त्यानंतर त्याने हा संदेश दिला: “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल?


आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,


त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.”


याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे: “मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन. जगाच्या उत्पत्तीपासून ठेवलेले रहस्य मी त्यांना सांगेन.”


प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले.


कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.


तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”


आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे.


दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan