Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले. रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:22
14 Iomraidhean Croise  

सिंहाच्या जबड्यातून; रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.


परमेश्वरा, तुम्ही आपल्या पवित्रस्थानात भयावह आहात; इस्राएलचे परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य आणि बळ देतात. परमेश्वर धन्यवादित असो!


परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.


चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला.


याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.


आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”


“ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.


परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.


आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि गोर्‍हे व मोठे बैल यज्ञात पडतील. त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल, आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल.


त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला: “इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत.


“परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.


प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे; त्याची शिंगे रानबैलाची शिंगे आहेत, त्या शिंगानी तो राष्ट्रांना, पृथ्वीच्या दिगंती असलेल्यांना देखील भोसकतो. एफ्राईमाचे लाखो वंशज आणि मनश्शेहचे हजारो वंशज असे आहेत.”


कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan