Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 “बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:19
36 Iomraidhean Croise  

या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.


पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”


यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’


याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”


ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”


माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे.


याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”


याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की, एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत: “तुझ्या वंशजांपैकी एकाला मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन.


परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला


मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही.


सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—


केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.


तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,


गवत सुकते आणि फुले गळून पडतात, परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.”


मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला, त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन. जे मी बोललो, ते मी घडवून आणणार; जे मी योजले आहे, ते मी करेनच!


त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.


यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”


हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले.


मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. मनुष्य नाही. मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.


फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.


कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.


“मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत.


मी याहवेह हे बोललो आहे आणि जे माझ्या विरोधात एकत्र आले आहेत त्या संपूर्ण दुष्ट समाजाला मी असे निश्चितच करेन. त्यांचा शेवट ते या रानातच पाहतील; ते येथेच मरण पावतील.”


नंतर त्याने हा संदेश सांगितला: “बालाका, ऊठ आणि ऐक; सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.


कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात.


तर असे नाही की परमेश्वराचे वचन अयशस्वी ठरले. इस्राएल वंशातून आलेला प्रत्येकजण इस्राएली असेल असे नाही.


जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.


परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले


परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्‍या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.


परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”


प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते.


त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का?


याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.


जे परमेश्वर इस्राएलचे वैभव आहेत, ते असत्य बोलत नाहीत किंवा आपले मन बदलत नाही; कारण आपले मन बदलण्यास ते मानव नाहीत.”


एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan