Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मवाबाचा राजा मिद्यानीं लोकांच्या वडीलांना म्हणाला, बैल जसा शेतातले सगळे गवत खाऊन टाकतो तसेच हे लोक आपला नाश करतील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबाचा राजा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:4
13 Iomraidhean Croise  

ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.


एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;


मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर आणि प्रत्येक चौरस्त्यावर केवळ आकांतच आढळत आहे, कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.


इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले.


मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.


“मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.


त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.


मग याहवेह मोशेला म्हणाले,


ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.


सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय?


इस्राएली लोकांनी पुन्हा याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले, म्हणून त्यांनी त्यांना सात वर्षे मिद्यानी लोकांच्या हाती दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan