Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 याहवेहच्या दूताने बलामाला विचारले, “तू तुझ्या गाढवीला असे तीन वेळा का मारलेस? मी तुला अडविण्यास आलो कारण माझ्यासमोर तुझा मार्ग विपरीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परमेश्वराच्या दूताने बलामास विचारले, तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:32
19 Iomraidhean Croise  

याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.


ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.


तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता.


जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.


मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.


जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल.


विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा.


मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”


माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”


त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”


परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते.


तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”


गाढवीने मला पाहिले व तीन वेळा माझ्यापासून ती वळली. ती जर वळली नसती, तर आतापर्यंत मी तुला जिवे मारले असते, परंतु त्या गाढवीला वाचविले असते.”


याहवेहच्या दूताने बलामाला म्हटले, “त्या पुरुषांबरोबर जा, परंतु जे मी तुला सांगेन तेच तू बोलावे.” म्हणून बलाम बालाकाच्या त्या सरदारांबरोबर गेला.


“तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?


कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.


बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.


Lean sinn:

Sanasan


Sanasan