Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण देव बलामास म्हणाला, त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांस शाप देऊ नको. कारण ते माझे आशीर्वादित लोक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:12
27 Iomraidhean Croise  

“मी तुला एक मोठे राष्ट्र करेन, मी तुला आशीर्वाद देईन; आणि तुझे नाव महान करेन आणि तू एक आशीर्वाद असा होशील.


आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”


ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत; ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.


तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,


राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल, आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील. जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”


माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”


‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”


सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.”


तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”


याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!


मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.


ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही, त्यांना मी शाप कसा देऊ? ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही; त्यांचा तिरस्कार मी कसा करू?


सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”


त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”


कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात.


परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.


याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.


तरीही याहवेह तुमच्या परमेश्वराने बलामाचे ऐकले नाही, परंतु त्यांनी त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हावर प्रीती करतात.


तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल.


इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”


तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित व्हाल; तुमच्यापैकी कोणीही पुरुष वा स्त्री निःसंतान राहणार नाही किंवा तुमच्या पशूंपैकी कोणीही वांझ राहणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan