Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे जसे तू केलेस तसेच ह्याचेही कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस. कारण मी तुला त्याच्यावर, त्याच्या सर्व सैन्यावर आणि त्याच्या देशावर विजय दिला आहे. तू हेशबोनमध्ये राहणाऱ्या अमोऱ्यांचा राजा सीहोन ह्याचे जे केलेस तेच याचेही कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:34
24 Iomraidhean Croise  

तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.”


त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”


परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”


हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील.


कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन.


मात्र याहवेहविरुद्ध बंड करू नका. आणि तेथील लोकांचे भय बाळगू नका, कारण आम्ही त्यांना नष्ट करणार. त्यांचे संरक्षण नाहीसे झाले आहे, परंतु याहवेह आमच्याबरोबर आहेत. त्यांचे भय बाळगू नका.”


हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”


परंतु हेशबोनाच्या सीहोन राजाने आम्हाला जाण्यास परवानगी दिली नाही. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्याला तुमच्या हातात देण्यासाठी त्याचा आत्मा हट्टी आणि त्याचे हृदय कठीण केले होते.


त्याने म्हणावे: “हे इस्राएली लोकहो, ऐका: जेव्हा आज तुम्ही लढण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध पुढे जात आहात; मन कचरू देऊ नका वा भयभीत होऊ नका; त्यांना घाबरू वा भिऊ नका.


मग आम्ही वळलो आणि बाशानाच्या वाटेने वर गेलो आणि बाशानचा राजा ओग आपले सर्व सैन्य जमवून आमच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे आला.


(रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग हा शेवटचा होता. त्याचा पलंग लोखंडाने सजविला होता आणि तो चार हात लांब आणि दोन हात रुंद होता. तो अजूनही अम्मोनी लोकांच्या राब्बाहमध्ये आहे.)


खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही.”


तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?”


परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा.


तुम्ही त्यांना भिऊ नका, कारण महान व भयावह असे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर आहेत.


ते त्यांच्या राजांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांची नावे या पृथ्वीतलावरून पुसून टाकाल. मग कोणीही तुमच्याविरुद्ध उभा राहणार नाही; तुम्ही त्यांचा नाश कराल.


तेव्हा यहोशुआ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; निराश होऊ नका. खंबीर आणि धैर्यवान व्हा, कारण याहवेह तुमच्या सर्व शत्रूंच्या बाबतीत हेच करणार आहेत.”


तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.”


तेव्हा तुम्ही दबा धरून बसलेले ठिकाण सोडून आय शहराचा ताबा घ्यावा. याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या हाती देतील.


इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,


दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan