Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह असे पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांस कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:3
11 Iomraidhean Croise  

याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.


निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील; त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत.


मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली.


तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.


मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले.


तिथे डोंगराळ देशात राहणार्‍या अमोर्‍यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.


कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्‍या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये.


होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,


एलतोलाद, कसील, होरमाह,


नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.


होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना


Lean sinn:

Sanasan


Sanasan