Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग इस्राएलाने अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:21
16 Iomraidhean Croise  

यबूसी, अमोरी, गिर्गाशी,


“नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.


अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला.


ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला, त्यांची करुणा सनातन आहे.


“हेशबोनच्या सावलीत फरारी हतबलपणे उभे आहेत, हेशबोनमधून अग्नी येत आहे, सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत; त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे, त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.


आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.


हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.


जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला.


आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्‍यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.


यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:


कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.


“ ‘यार्देनेच्या पूर्वेकडे राहणार्‍या अमोर्‍यांच्या देशात मी तुम्हाला आणले. ते तुमच्याविरुद्ध लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले. तुमच्यापुढे त्यांचा नाश केला आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला.


याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी,


Lean sinn:

Sanasan


Sanasan