Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेथून कूच करून ते बएर (म्हणजे विहीर) येथे गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, ‘लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन’ तीच ही विहीर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेथपासून ते बैर येथे प्रवास करीत गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते तीच ही विहिर आहे, “माझ्यासाठी लोकांस एकत्र जमव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:16
16 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.


होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.


तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.


त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात. त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते, त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.


रानातील हिंस्र श्वापदे कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, ओसाड भूमीत झरे बनवितो,


ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील आणि त्यांना पाण्याच्या झर्‍यांजवळून चालवितील.


“आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”


दिबोन-गाद सोडल्यावर त्यांनी आलमोन-दिबलाथाइम येथे तळ दिला.


येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”


परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”


ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन.


मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.


आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे.


मग योथाम निसटून गेला व आपला भाऊ अबीमेलेखाच्या भीतीमुळे बैर येथे जाऊन राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan