Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 पण आम्ही जेव्हा याहवेहचा धावा केला, तेव्हा याहवेहने आमचे रडणे ऐकले, त्यांनी एक दूत पाठवून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. “आता आम्ही इथे तुझ्या सीमेवरील टोकावर, कादेश नगरात आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:16
14 Iomraidhean Croise  

फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली.


मग परमेश्वराचा दूत, जो इस्राएलांपुढे प्रवास करीत होता, तो आता त्यांच्या मागच्या बाजूला गेला. मेघस्तंभ देखील त्यांच्यापुढून निघून त्यांच्यामागे गेला,


“पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे.


मी तुमच्यापुढे एक दूत पाठवून कनानी, अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांना बाहेर हाकलून देईन.


आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.


माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”


आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली,


“आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”


त्यांनी कादेश सोडले आणि एदोमच्या सीमेवरील होर पर्वतावर तळ दिला.


कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्‍या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?


तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,


यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan