Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:14
20 Iomraidhean Croise  

याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्‍यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.”


पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.


मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.


मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.


मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.


याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,


याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.


पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली.


आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली,


संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.


परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता.


कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.


आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.


त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्‍यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे.


त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan