Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “दर्शनमंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्राएल लोकांनी आपापल्या निशाणाजवळ व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजाजवळ आपले डेरे द्यावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 2:2
23 Iomraidhean Croise  

तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या, आणि त्यांनी प्रमाण स्वरूप आपले ध्वज उभारले आहेत.


तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.


सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”


अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.


परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.


त्या दिवशी मेंढपाळ जसा आपल्या मेंढरांना वाचवितो, त्याप्रमाणे याहवेह त्यांचे परमेश्वर त्यांच्या लोकांना वाचवतील. मुकुटामध्ये बसविलेल्या रत्नांप्रमाणे ते त्यांच्या देशात चमकतील.


परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.


यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.


त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.


एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता.


शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता.


याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले:


दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे.


पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा.


जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला


कारण परमेश्वर हे अव्यवस्था व गोंधळ यांचे परमेश्वर नसून शांततेचे आहेत—हे प्रभूच्या सर्व मंडळ्यांमध्ये दिसले पाहिजे.


तरीपण प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित आणि योग्यरीतिने केली जावी.


पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,


त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.


तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan