Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:13
27 Iomraidhean Croise  

जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ”


नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात.


शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे.


“अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”


मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे.


“त्यांना सांग: ‘आतापासून पुढे पिढ्यान् पिढ्या जो कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी याहवेहसाठी आणलेल्या पवित्र अर्पणांना स्पर्श करेल, त्याचा माझ्या समक्षतेपासून उच्छेद करावा; मी याहवेह आहे.


“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,


“अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.


कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास;


आणि त्यांनी केलेल्या पापांचा दंड म्हणून कळपातील एक मादी कोकरू किंवा शेळी याहवेहला पापार्पण अशी करावी; आणि याजकाने त्यांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.


परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.


जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”


“ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.


“एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे,


आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे.


जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील.


पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.


“शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.


त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.


पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल.


मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही तुमच्या पापात मराल; मी तो आहे, असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही खरोखर तुमच्या पापात मराल.”


तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?


हे विधी केवळ अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या शुद्ध करण्याच्या विधी याबाबत आहेत—बाह्य नियम नवा काळ येईपर्यंत लावून दिले आहेत.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”


नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan