Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:11
22 Iomraidhean Croise  

निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.


आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या खात चालले आहेत. ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही.


“ ‘देश शुद्ध करण्यासाठी इस्राएली लोक त्या मृतकांना सात महिने पूरत राहतील.


शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे.


जमिनीवर सरपटणार्‍यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,


ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये.


“ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,


एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे.


मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”


“जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.


“जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.


इस्राएली लोकांना आज्ञा दे की, ज्यांना चर्मरोग आहे किंवा कोणत्याही प्रकारचा स्राव आहे किंवा जो मृतदेहाच्या विधीमुळे अशुद्ध झाला आहे, त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे.


“ ‘याहवेहला समर्पित केलेल्या त्यांच्या संपूर्ण कालावधीत, नाजीराने मृतदेहाजवळ जाऊ नये.


“इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,


परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.


दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.


ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले,


एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.


यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”


तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.


तर, सनातन आत्म्याद्वारे ज्याने परमेश्वराला स्वतःस निष्कलंक असे अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त मृत्यूस कारणीभूत असणारी कामे केल्याच्या टोचणीपासून आपल्या विवेकबुद्धीला शुद्ध करून परमेश्वराची सेवा करण्यास किती अधिक प्रवृत्त करेल!


Lean sinn:

Sanasan


Sanasan