Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:7
28 Iomraidhean Croise  

अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.


“तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.


त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.


“ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील.


माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली.


याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.


होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे.


ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.


कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या.


याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”


ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.


याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”


मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.


आजार्‍यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.


त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल.


मी जो प्रभूच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली.


त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.


आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो.


तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”


तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा;


जो कळप तुमच्या हाती सोपविला आहे त्यांच्यावर प्रभुत्व दाखवू नका, परंतु लोकांसमोर उदाहरण म्हणून राहा.


माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएल लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan