गणना 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “लेवीचे वंशज दर्शनमंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे. Faic an caibideil |
“याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती.
त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते.