गणना 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जितकी पवित्र समर्पणे इस्राएल लोक परमेश्वराला अर्पण करतील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व मुलींचा निरंतरचा हक्क आहे; हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अति पवित्र आणि दृढ करार1 केला आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.” Faic an caibideil |