Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथमउपज लोक परमेश्वराला अर्पण करतील तो मी तुला दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:12
19 Iomraidhean Croise  

परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.


एके दिवशी बआल-शालीशाह येथून एका मनुष्याने आपल्या प्रथम पिकातील काही धान्य आणि जवाच्या वीस भाकरी एका पिशवीत घालून परमेश्वराच्या मनुष्याकडे आणल्या. तेव्हा तो म्हणाला, “लोकांना खाण्यास दे.”


आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.


ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात.


मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते; तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”


“आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.


“तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


“तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”


प्रथमफळातील जे सर्वोत्तम आणि तुमच्या सर्व विशेष भेटी याजकांच्या होतील. तुमच्या भूमीतील प्रथम भाग याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराण्यावर आशीर्वाद राहेल.


तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये.


“ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे.


तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे.


याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल.


बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्‍या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस.


याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी,


तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे


त्यांनी त्याला कळपातील गाईंचे दही-दूध, पुष्ट शेळ्या आणि मेंढरे, आणि बाशानाचे अस्सल मेंढे, आणि सर्वोत्तम गहू पुरविला, तुम्ही गडद लाल फेसाळणारा द्राक्षारसही प्यालात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan