Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पवित्रस्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल; त्याचप्रमाणे याजकपदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:1
22 Iomraidhean Croise  

ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”


वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.


आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला.


“त्यानंतर तू आपल्या डाव्या कूशीवर पड आणि इस्राएली लोकांचे पाप आपल्या स्वतःवर ठेव. जितके दिवस तू एका कूशीवर पडशील तितके दिवस त्यांच्या पापाचा भार तू वाहशील.


“तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे.


ती पवित्र अर्पणे खाण्यास मनाई न केल्यास पापदंड भरण्याची शिक्षा त्यांच्यावर ते ओढवून घेतील; मी याहवेह आहे, जो त्यांना पवित्र करतो.’ ”


“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.


चाळीस दिवस तुम्ही देश हेरला त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला एक वर्ष अशी चाळीस वर्षे तुम्ही आपल्या पापाचे परिणाम भोगाल आणि माझ्या विरोधात जाणे कसे असते हे तुम्ही जाणाल.


त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता.


जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”


लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी.


मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.


हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.


“लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.


याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.


आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.


ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.


त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.”


तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan