गणना 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही परमेश्वराच्या निवासमंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आपल्याजवळ येऊ दिले; ह्या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हांला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे हे काय थोडे झाले? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का? Faic an caibideil |
ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.
त्यावेळी प्रथम हंगामाची अर्पणे व दशांश या अर्पणांच्या भांडारावर पुरुष अधिकारी नेमण्यात आले. ही सर्व अर्पणे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सभोवतीच्या नगरींच्या शेतांप्रमाणे अर्पणे याजक व लेवींना नेमून देण्यात आली, त्यांनी ती गोळा करून भांडारात जमा करावयाची होती. कारण यहूदीयाच्या लोकांना लेवी व याजक आणि त्यांचे सेवाकार्य यांचे कौतुक वाटत होते.