गणना 16:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती. Faic an caibideil |