Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा अर्पण करणार्‍याने गोर्‍ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:9
18 Iomraidhean Croise  

अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”


समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.


तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.


मेजवान्या आणि नेमलेल्या सणांच्या वेळी, एका गोर्‍ह्यामागे एक एफाह, एका एडक्यामागे एक एफाह आणि कोकर्‍यांबरोबर त्याला आवडेल त्याप्रमाणे धान्य आणावे आणि एका एफाहमागे एक हीन तेल आणावे.


याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे.


एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्‍याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे.


त्याने एका गोर्‍ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्‍याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे.


याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.


कोण जाणो? याहवेह तुमचे परमेश्वर वळतील व अनुताप करतील आणि तुमच्यासाठी एक आशीर्वाद सोडतील— मग याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही धान्यार्पण व पेयार्पण करू शकाल.


आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.


“अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.


होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत.


आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे.


“ ‘जेव्हा तुम्ही होमार्पण किंवा यज्ञ म्हणून, याहवेहला विशेष नवस किंवा शांत्यर्पण म्हणून एक तरुण बैल तयार करता,


प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ;


प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर अर्धा हीन पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन, व प्रत्येक कोकर्‍याबरोबर एक पाव हीन द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे.


मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.


त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल, एक एफा सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan